Rajasthan Shocker: रील बनवण्यासाठी तरुणाने 150 फूटांवरून खदानीत मारली उडी, युवकाचा मृत्यू; VIDEO व्हायरल
त्याचवेळी रील शूट करण्यासाठी त्याने खदानीत उडी मारली पण तो परत बाहेर आलाच नाही. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सध्या सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी अनेक धडपड करत असतात. या नादात अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) घडली आहे. रील्स (Reels) तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये (Udaypur) ही घटना घडली आहे. एका तरुणाने रील्स तयार करण्यासाठी तब्बल 150 फूटांवरून खदानीत उडी मारली. या घटनेमध्ये खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. दिनेश मीणा असं या तरुणाचे नाव आहे. उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाई गावामध्ये हा तरुण राहत होता. हा तरुण आपल्या चार मित्रांसोबत खदानीवर फिरण्यासाठी गेला होता. (हेही वाचा - Mizoram Quarry Collapse: मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून 10 ठार, अनेकजण बेपत्ता; बचावकार्य सुरू)
हा तरुण मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर रील्स शूट करत होता. त्याचवेळी रील शूट करण्यासाठी त्याने खदानीत उडी मारली पण तो परत बाहेर आलाच नाही. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिनेशने रील्स बनवण्यासाठी 150 फूटांवरून खदानीत उडी मारली. पण तो बराच वेळ पाण्यातून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे मित्र चिंतेत आले आणि त्यांनी याबाबत गोवर्धन पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सिव्हिल डिफेन्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तीन तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह खदानीतून बाहेर काढला.
चौकशीदरम्यान मृत तरुणाचे मित्र म्हणाले की, रील बनवताना त्याचा पाय घसरला आणि ते उडी मारण्याचेही बोलत होते. सध्या पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.