Rajasthan News: तरुणाने स्फोटकांनी स्वत:ला उडवले; गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याच्या नैराश्येतून कृत्य

एका तरुणाने शरीराला चक्क स्फोटके (Detonator) बांधून स्वत:ला उडवून दिले आहे. या घटनेत तरुणाचे शीर धडावेगळे होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचे एका तरुणीसोबत कथीतरित्या प्रेमसंबंध होते.

Blast | Representational image (Photo Credits: pxhere)

Girlfriend-Boyfriend News: राजस्थान (Rajasthan) राज्यातील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने शरीराला चक्क स्फोटके (Detonator) बांधून स्वत:ला उडवून दिले आहे. या घटनेत तरुणाचे शीर धडावेगळे होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचे एका तरुणीसोबत कथीतरित्या प्रेमसंबंध होते. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी लावल्याने तो निराश होता. प्रेयसीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी ठरल्याच्या वैफल्यग्रस्तेतून त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिल्याचे समजते. नीलेश मीणा (24) असे तरुणाचे नाव आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) रात्री उशीरा ही घटना घडली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नीलेश मीणा (मृत) याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत विवाह करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, दोघांचेही गोत्र एकच असल्याने कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. परीणामी तिचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरवला. या घटनेमुळे समूळ हादरुन गेलेल्या आणि प्रचंड निराश झालेल्या तरुणाने स्वत:ला स्फोटकांच्या हवाली केले. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी हजेरी लावत तरुणाचा मृतदेह आणि इतर काही सामग्री ताब्यात घेतली. शवविच्छेदन झाल्यानतंर तरुणाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणीच्या कुटुंबीयांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.

प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे की, नीलेश याने रविवारी दुपारीच कोठून तरी डेटोनेटर आणले होते. त्यानंतर त्याने रात्र होण्याची वाट पाहीली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तो घरापासून 100 मीटर अंतरावर दूर गेला. तिथे त्याने आपल्या शरीराला टेटोनेटर लावून स्वत:ला उडवून दिले. स्पोटकांचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील नागरी घटनास्थळी आले असता तरुणाचे शीर धडावेगळे झाल्याचे पाहायला मिळाले.

एक्स पोस्ट

सदर घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांनी तरुणीच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, तरुणीच्या कुटुंबीयांनीच त्याचे शीर धडावेगळे केले. नीलेश हा शेतकरी कुटुंबातून येतो. त्याचे घर शेतीवर आणि मोलमजुरीवर चालते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्याच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्याचे डोकेही धडासोबत राहिले नव्हते. नीलेशच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहीण आहे. पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नीलेशचे वडील राजमल मीणा यांनी ऋषभदेव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, रविवारी रात्री बारा वाजणेच्या सुमारास काही लोक माझ्या मुलाला घरातुन बोलवून घेऊन गेले होते. त्यांनी माझ्या मुलाचा गळा कापला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif