'पुढील 10 वर्ष राहुल गांधी कुठल्याही निवडणूकीत जिंकू शकणार नाहीत' असं कोण म्हणालं?
ज्यामुळे पुढील 10 वर्ष राहुल गांधी कुठल्याही निवडणूकीत जिंकू शकणार नाहीत,” कमाल यांनी असं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
बिग बॉस 3 मधून प्रसिद्धी मिळवलेला कमाल खान हा एक स्वयंघोषित समीक्षक आहे. प्रत्येक विषयावर काहीतरी वादग्रस्त मत मांडून तो कायमच चर्चेत राहायचा प्रयत्न करत असतो. आता ही त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर एक ट्विट करत स्वतःसाठीच एक नवी अडचण तयार करून घेतली आहे.
काय आहे त्याचं ट्विट?
“काश्मीरच्या मुद्दयावरुन राहुल गांधी यांनी जर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला तर देशातील एकही नागरिक काँग्रेस पक्षाला मतदान करणार नाही. ज्यामुळे पुढील 10 वर्ष राहुल गांधी कुठल्याही निवडणूकीत जिंकू शकणार नाहीत,” कमाल यांनी असं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
कमाल यांच्या या ट्विटवर शेकडो नेटकऱ्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्याची अनेकांनी कमालच्या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस समर्थकांनी मात्र कमाल यांच्या ट्विटवर जोरदार टीका केली आहे.
कमाल याही आधी अनेक मुद्द्यांमुळे वादात अडकले आहेत तर अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, “जर एका राम मंदिरामुळे संपूर्ण देशात शांतता आणि सुसंवाद होणार असेल, तर मुस्लिम नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिरबाबत सुरु असलेला खटला मागे घ्यावा. कारण एक मशिद संपूर्ण देशाच्या शांततेपेक्षा मोठे नाही. अस मला वाटतं.”