Rahul Gandhi ON Demonetisation: नोटबंदीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, आपल्याला पुन्हा एकदा नव्या भारताची उभारणी करावी लीगेल- राहुल गांधी

या निर्णयाचा उद्देश केवळ त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना मदत करणे हाच होता. या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था अत्यंत प्रतकुल अवस्थेत गेली.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नोटबंदीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नोटबंदी निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा धक्का बसला. अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. यातून बाहेर पडायला खूप कालावधी लागेल आणि खूप काम करावे लागेल. आपल्याला पुन्हा एकदा नव्याने नव्या भारतासाठी सुरुवात करावी लागेल. राहुल गांधी हे एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. नोंटबंदीच्या निर्णयाला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त नोंटबंदी निर्णयाचा दिवस काँग्रेस 'विश्वासघात दिन' म्हणून साजरा करत आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा उद्देश केवळ त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना मदत करणे हाच होता. या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था अत्यंत प्रतकुल अवस्थेत गेली. राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी सातत्याने सांगत आली आहे की, 2016 मध्ये जाहीर केलेली नोटबंदी ही जनतेच्या हिताची नाही. या निर्णयाचा नागरिकांच्या जीवनमानावर प्रचंड परीणाम होणार आहे. परंतू, सरकार मात्र सातत्याने नोटबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत आले आहे. नोटबंदीच्या विरोदात आयोजित एका ऑनलाईन अभियान 'स्पीक अप अगेन्स्ट डिमो डिजास्टर' मध्ये राहुल गांधी बोलत होते. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020: मोदी यांनी लोकांवर आधी नोटाबंदी आणि नंतर जीएसटीची कुऱ्हाड मारली; राहुल गांधी यांची पुन्हा पंतप्रधानांवर टीका)

राहुल गांधी यांनी सांगितले की, खरे तर प्रश्न असा आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही बांग्लादेश अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे गेलीआहे. हे कसे घडले. जेव्हा एक वेळ होती भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वश्रेष्ट अर्थव्यवस्था होती. परंतू आता भारताचे ते स्थान राहिले नाही. केंद्र सरकार याचे कारण कोरोना व्हायरस असे देत आहे. परंतू कोरोना केवळ भारतातच नाही. तर संपूर्ण जगामध्ये आहे. इतर देशांची अर्थ्यवस्था मजबूत होत असताना भारतातच असे काय घडले की, ज्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. खरेतर भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येण्यामागे नोटबंदी आणि जीएसटीसारखा निर्णय ही दोन कारणेच आहेत, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.