Alwar Gangrape Case: राहुल गांधी यांच्या भेटीनंतर अलवार येथील बलात्कार पीडित कुटुंबाला न्यायाबद्दल दिलासा
राहुल गांधी आणि पीडित कुटुंब यांच्यात चर्चा सुरु असताना कुटुबाबाहेरी व्यक्ती आणि राहुल गांधी याच्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर कुटुंबाने सांगितले की, या भेटीनंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. आम्ही न्यायाबद्दल निश्चिंत आहोत.
Rajasthan Alwar Gangrape Case: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थान (Rajasthan) राज्यातील अलवार (Alwar) जवळील थानागांजी येथे जाऊन सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, पीडिता आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतल्यनंतर मला या प्रकरणाबाबत अधिक धक्कादायक माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर मी मुख्यमंत्री अशोक गेहलोथ यांच्याची तातडीने चर्चा केली. दरम्यान, या प्रकरणाचा आपल्याला राजकीय मुद्दा करायचा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, पीडित कुटुंबासोबत काय चर्चा झाली असे प्रसारमाध्यमांनी विराचले असता, 'पीडितांशी झालेली माझी चर्चा व्यक्तिगत स्वरुपातील होती. त्यांनी त्यांचे अत्यंत व्यक्तिगत दु:ख व्यक्त केले. जे मी सार्वजनिक करु शकत नाही', असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली तेव्हा त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
राहुल गांधी आणि पीडित परिवार यांच्यात सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. राहुल गांधी आणि पीडित कुटुंब यांच्यात चर्चा सुरु असताना कुटुबाबाहेरी व्यक्ती आणि राहुल गांधी याच्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर कुटुंबाने सांगितले की, या भेटीनंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. आम्ही न्यायाबद्दल निश्चिंत आहोत. (हेही वाचा, Rajasthan Alwar Gangrape: नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप)
एएनआय ट्विट
पीडित कुटुंबाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाला नोकरी आणि भरपाईचे अश्वासन देण्यात आले. हे अश्वासन लवकर पूर्ण करण्याचेही त्यांनी अश्वासन दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.