Puducherry Trust Vote: पुदुच्चेरीत मुख्यमंत्री V.Narayanasamy च्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार कोसळलं

आज त्यांनी विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर आता कॉंग्रेसच्या हातामधून अजून एक केंद्रशासित प्रदेशातील सत्ता गेली आहे.

पुदुच्चेरी मध्ये मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी | Photo Credits: Twitter/ANI

पुदुच्चेरी मध्ये मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी (Puducherry CM V.Narayanasamy) यांचं सरकार संकटामध्ये आले आहे. आज त्यांनी विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर आता कॉंग्रेसच्या हातामधून अजून एक केंद्रशासित प्रदेशातील सत्ता गेली आहे. दरम्यान व्ही नारायणस्वामी यांनी आपला राजीनामा देखील Lieutenant Governor कडे सादर केला आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या आमदारांनी राजीनामे दिल्याने हे राजकीय संकट आले आहे.या आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेस आघाडीचे संख्याबळ 11 पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे 14 आमदार आहेत. तर 7 जागा रिक्त आहेत. परिणामी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांच्यावर सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. Puducherry: Kiran Bedi यांना पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून हटवले; तेलंगानाच्या राज्यपाल Tamilisai Soundararajan सांभाळतील जबाबदारी.

ANI Tweet

मंत्री ए नमसिवायम, यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर मल्लाडी कृष्ण राव सह कॉंग्रेसच्या 4 आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. पार्टीच्या एका आमदाराला अयोग्य ठरवण्यात आले.दरम्यान नारायणसामी च्या जवळचे नेते ए जॉन कुमार यांनी देखील राजीनामा दिल्याने ही नामुश्की कॉंंग्रेसवर ओढावली आहे.

तेलंगणा चे राज्यपाल डॉक्टर तमिलिसाई सुंदरराजन यांना पुद्दुचेरी मध्ये उप राज्यपाल चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी नारातणसामी यांना 22 फेब्रुवारी मध्ये फ्लोअर टेस्ट मध्ये बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी किरण बेदी यांनाा उपराज्यपाल पदावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हटावले होते.