IPL Auction 2025 Live

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर

पोस्टल बॅलेट मतांची मोजणी झाल्यानंतर हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसर 37,000 मतांनी त्या आघडीवर आहेत.

Priyanka Gandhi | (Photo Credits: X)

लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड (Lok Sabha By-Election Results 2024) येथून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) आघाडीवर आहेत. पोस्टल बॅलेट मतांची मोजणी झाल्यानंतर हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसर 37,000 मतांनी त्या आघडीवर आहेत. या मतदारसंघातून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2024 लढवली होती. मात्र, त्याच वेळी त्यांनी रायबरेली येथूनही निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना दोन्हीपैकी एका जागेवरुन राजीनामा देणे भाग होते. त्यांनी रायबरेलीची निवड केली आणि वायनाडच्या ( Wayanad Bypoll Results) खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवले.

वायनाडमध्ये एकूण 19 उमेदवार रिंगणात

वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या रुपात प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात पदार्पण केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी यांनी 51,930 मते मिळवली आहेत. तर त्यांच्या विरोधात मैदानात असलेल्या सीपीआय नेता सत्यान मोकारी यांनी 14,629 मते घेतली आहेत. भाजपच्या नव्या हरीदास यांना केवळ 7,613 मते मिळाली आहेत. वायनाड येथून एकूण 16 उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये गांधी आघाडीवर आहेत. गांधी या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा दावा त्यांचे समर्थक आणि पक्षाचे नेते करत आहेत. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर; महेश सावंत यांची आघाडी)

वायनाडच्या विकासासाठी प्रियंका यांचे खास धोरण

वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी सलग दोन वेळा निवडणूक लढवली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यापाठोपाठ ते अलिकडेच पार पडलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही विजयी झाले. मात्र, त्यांनी येथून राजीनामा देत आपल्या बहिणीसाठी जागा रिकामी करुन दिली. प्रियंका यांच्या प्रचारासाठी स्वता: सोनिया गांधी आल्या होत्या. शिवाय राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांनी देखील सभा आणि रॅली काढल्या होत्या. प्रियंका यांच्यासाठी पक्षान तब्बल पाच लाखांहून अधिक मते घेत मोठा विजय मिळविण्याचे निश्चित केले होते. आगामी काळात वायनाड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध झाले पाहिजे. जेव्हा कोणी वायनाडचे नाव घेतील तेव्हा हा भाग पर्यटनासाठीच ओळखला गेला पाहिजे अशई अशी या मतदारसंघाती ओळख करणार असल्याचे प्रियंका गांधी यांनी आपल्या मतदारांना आश्वासन दिले होते. याशिवया मतदारसंघातील नागरिकांना रोजकागर आणि स्थानिकांची आर्थिक भरभराट होण्यासाठी विकासकामे करण्यासाठी विविध योजना आणणार असल्याचेही प्रियंका गांधी यांनी म्हटले होते.

दरम्यान, प्रियंका गांधी यांची लोकसभेत होणारी एन्ट्री काँग्रेससाठी मोठी आश्वासक असणार आहे. सध्यास्थितीत राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून एकटेच किल्ला लढवत असतात. त्यामळे प्रियंका गांधी या लोकसभेत आल्यास काँग्रेससाठी आणखी एक आक्रमक चेहरा मिळणार आहे. प्रियंका गांधी आक्रमक शैलीत भाषण करतात. इतकेच नव्हे तर अभ्यास आणि महत्त्वाचे मुद्दे त्या आपल्या भाषणातून मांडतात.