Rahul Gandhi Disqualified As MP: राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियंका गांधींनी मांडली घोटाळ्यांची यादी
काँग्रेस सचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्विट करत भाजपावर टिका केली असून त्यांनी काही मोठ्या घोटाळ्यांची यादी त्यात मांडली असून देशातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचे भाजप नेते समर्थन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi Disqualified As MP: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने (Surat Court) मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या कारवाईनंतर राहुल गांधींची बहिण प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील भाजप सरकारवर टिका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप देखीस त्यांनी केला आहे.
काँग्रेस सचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्विट करत भाजपावर टिका केली असून त्यांनी काही मोठ्या घोटाळ्यांची यादी त्यात मांडली असून देशातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचे भाजप नेते समर्थन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी देशाटे पैसे लुटले भाजप त्यांचा बचाव करण्याचे काम करत आहे असे म्हणताना नीरव मोदी घोटाळा (14,000 कोटी), ललित मोदी घोटाळा (425 कोटी) , मेहुल चोकसी घोटाळा (13,500 कोटी) यांची नावे प्रियंका यांनी लिहले आहेत.
दरम्यान आता राहुल गांधी यांच्यावर पुढील कोणती कारवाई होणार हे पहावं लागणार आहे. यापूर्वी अशीच एनसीपी खासदारावरही कारवाई झालेली होती मग त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता पण अद्याप त्यांची कारवाई मागे घेण्यात आलेली नाही. काल राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टाने निकाल देताच आज 24 तासाच्या आतच लोकसभा सचिवालयाने कारवाई केली आहे.