चांद्रयान-2 अवकाशात झेपावले, 'ISRO'च्या ऐतिहासिक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक खास ट्विट करून या यशासाठी ISRO चे कौतुक केले आहे. मोदींनी आपल्या ट्विट मध्ये #Chandrayaan2 ही मोहीम भारतीयनसाठी एक गौरवाचा क्षण असल्याचे म्हंटले आहे
भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची (ISRO) महत्वाकांक्षी मोहीम म्हणजेच चांद्रयान 2 (Chandryaan 2) ने काहीच वेळापूर्वी अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. यानंतर सर्वच माध्यमातून ISRO च्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा एक खास ट्विट करून या यशासाठी ISRO चे कौतुक केले आहे. मोदींनी आपल्या ट्विट मध्ये #Chandrayaan2 ही मोहीम भारतीयांसाठी एक गौरवाचा क्षण असल्याचे म्हंटले आहे यामुळे येत्या काळात विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तसेच अधिकाधिक तरुण विद्यार्थी या क्षेत्राकडे वळण्यास प्रोत्साहित होतील अशी आशा व्यक्त केली आहे. चांद्रयान मोहिमेमुळे अभ्यासकांना प्रेरणा मिळेल, व आपल्याकडील चंद्राच्या संबंधित असलेल्या ज्ञानात वृद्धी होईल असेही मोदींनी म्हंटले आहे. तसेच, चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेसाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
नरेंद्र मोदी ट्विट
दरम्यान, चांद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्याची प्रगती योग्य दिशाने असल्याचे संशोधक व शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे.इस्त्रोच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे चांद्रयान 2 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर पोहचेल.