बायकोला दाखवला पॉर्न; लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याची रवानगी पोलीस ठाण्यात; गुजरात राज्यातील मोठ्या शहरातील घटना

पण, मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाने नववधूसोबत असे काही वर्तन केले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाची रवानगी थेट पोलीस स्टेशनमध्ये झाली.

| (Photo Credit: Archived, edited, representative images)

विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन. एकमेकांसोबत आयुष्य काढायच्या आणभाका. पण, काही जोडप्यांमध्ये दोघांपैकी एक इतका विचित्र आणि विक्षिप्त निघतो की, जोडीदाराला उभे आयुष्य त्याच्यासोबत कसे काढावे याचीच चिंता लागते. गुजरात राज्यातील वडोदरा शहरात अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. या शहरात एका तरुणीचा एका तरुणासोबत विवाह झाला. दोघांचे लग्न लाऊन नातेवाईक आपापल्या मार्गाने गेले. हे जोडपं मधुचंद्र (Honeymoon) साजरा करण्यासाठी एकत्र आले. पण, मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाने नववधूसोबत असे काही वर्तन केले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाची रवानगी थेट पोलीस स्टेशनमध्ये झाली.

घटना अशी घडली की, विवाहानंतर हे जोडपे मधुचंद्रासाठी एकत्र आले. पण, सर्वसाधारण जोडपी मधुचंद्राच्या रात्री जसे वर्तन करतात त्यापेक्षा या तरुणाने नववधुकडे भलताच आग्रह धरला. नवरदेव असलेल्या तरुणाने नववधुला चक्क अश्लिल चित्रफीत म्हणजेच पॉर्न चित्रपट (Porn Movie) दाखवालयला सुरुवात केली. तो केवळ तिला पॉर्न व्हिडिओ (Porn Video) दाखवूनच थांबला नाही. तर त्याने तिच्याकडे अप्रकृतीक संभोग (Unnatural Sex Groom) करण्याची मागणी केली. तरुणीने असे करण्यास नकार दिला. परंतू, तरुणाने जुमानले नाही. अनैसर्गिक सेक्स (Unnatural Sex) करण्यासाठी तिला आग्रहच धरला तसेच, अनैसर्गिक संभोगासाठी तिला प्रवृत्त केले. शेवटी वैतागून आणि त्रास सहन न झाल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील पती आणि पत्नी दोघेही लग्नाच्या आधिपासून एकमेकांना ओळखतात. 13 डिसेंबर 2019 या दिवशी दोघांचा विवाह पार पडला. या विवाहास दोन्हीकडील कुटुंबीयांची संमती होती. तसेच, त्यानुसार राजीखुशीत हा विवाह पार पडला. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर 2019 या दिवशी हे जोडपे याच शहरातील एका हॉटेलमध्ये गेले. इथे तरुणाने पीडितेला अश्लिल चित्रफित दाखवून त्यात दाखवल्याप्रमाणे संभोग करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तसा आग्रह धरत तिला तसे करण्यात प्रवृत्त केले. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर जोडप्याने रात्री साधारण 2.30 च्या सुमारास हॉटेलमध्ये प्रवेश केला. काही वेळातच हे जोडपे हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांनी घडल्या प्रकाराबद्धल आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन तरुणाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 377 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अश्लिल कृती दाखवणे, अनैसर्गिक संभोगासाठी प्रवृत्त केल्याचा तरुणावर आरोप आहे. याशिवया आयटी अॅक्ट अन्वयेही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.