तृतीयपंथीयांवर दगडफेक आणि शिव्या देत मारहाण करण्याऱ्या तरुणांचा पोलिसांकडून तपास सुरु

तृतीयपंथी (Transgender)यांच्यावर नवी दिल्ली येथे काही तरुणांनी दगडफेक आणि शिव्या देत मारहाण केल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

तृतीयपंथी (Transgender)यांच्यावर नवी दिल्ली येथे काही तरुणांनी दगडफेक आणि शिव्या देत मारहाण केल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित तृतीयपंथीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या अज्ञात आरोपी तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्कच्या परिसरात तृतीयपंथीयांवर घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी तृतीयपंथीयांविरुद्ध वाईट पद्धतीने बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यावेळी तरुणांनी या पीडित तृतीयपंथीयांवर संताप व्यक्त करत दगडफेक करुन त्यांना मारहाण केली.

या प्रकरणी तृतीयपंथीयांनी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पीडित तृतीयपंथी मैत्रिणींसोबत एका क्लब मधून बाहेर पडल्यार ही घटना घडल्याचे स्पष्टीकरणात सांगितले आहे.