Agriculture Infrastructure Fund अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना वित्त सुविधा देण्याची केली घोषणा
पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतीसाठी युरियाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याने चिंता व्यक्त केली. यामुळे जमिनीला नुकसान होत असून शेतक-यांनी याविषयी विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे Agriculture Infrastructure Fund अंतर्गत एक लाख कोटी रुपये वित्तपोषण सुविधा सुरु करण्याची घोषणा केली. यात PM-KISAN योजनेअंतर्गत विशेष फायदे देण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी 8.5 कोटी शेतक-यांच्या खात्यात 17,000 कोटी PM-KISAN योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. हे टप्प्याटप्याने शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा होईल असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतीसाठी युरियाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याने चिंता व्यक्त केली. यामुळे जमिनीला नुकसान होत असून शेतक-यांनी याविषयी विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. Vijayawada Fire: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयवाडा COVID-19 सेंटर मध्ये आगीच्या दुर्घटनेवर ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले दु:ख; See Tweet
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतक-यांना भगवान बलराम जयंतीच्या शुभेच्छा देत या शुभ दिनी शेतक-यांना एक लाख कोटी रुपये विशेष फंड लाँच केले. मोदी म्हणाले, "यामुळे गावा-गावांत चांगले भंडारण, आधुनिक कोल्ड स्टोरेज ची साखळी बनण्यास मदत होईल. मला आनंद होत आहे की, या योजनेचे जे लक्ष्य आहे, ते साध्य होत आहे."
या योजनेने शेतक-यांना खूप फायदा होईल. त्यासोबतच Agriculture Infrastructure Fund हे आत्मनिर्भर भारत अभियानचा संकल्प आहे ज्याच्यावर आपल्या सर्वांना काम करायचे आहे.