PM Narendra Modi Travels by Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेट्रो प्रवास; दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यास उपस्थिती (Watch Video)

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले होते. या वेळी त्यांनी आपल्या नियमीत ताफ्याचा वापर करण्याऐवजी मेट्रोने प्रवास केला.

PM Narendra Modi Travels by Metro | (Photo credit-Twitter/ANI)

PM Narendra Modi Travel in Delhi Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले होते. या वेळी त्यांनी आपल्या नियमीत ताफ्याचा वापर करण्याऐवजी मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी (University of Delhi Centenary Celebration) सोहळ्याचा आज (30 जुलै) समारोप समारंभ पार पडत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते तीन इमारतींची पायाभरणी करतील आणि कॉफी टेबल बुक्स सेटचे प्रकाशन करतील.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन आगोदरच दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमाच्या समारोपास आपण उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “उद्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यात सामील होण्यासाठी उत्सुक आहे. शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून, DU शतकानुशतके प्रतिभेचे पालनपोषण करत आहे आणि बौद्धिक विकासाला चालना देत आहे." (हेही वाचा, PM Narendra Modi In Karnataka Elections: पीएम नरेंद्र मोदी प्रभावशून्य, 19 रॅली, 6 रोड शो फ्लॉप; कर्नाटक काँग्रेस'च्या 'पंजा'त; भाजपचे कमळ पराभवाच्या चिखलात)

व्हिडिओ

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी विशेष नियमावली आणि मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षांना कार्यक्रमादरम्यान कळे कपडे घालण्यास अनुमती असणार नाही. तसेच, सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत वर्ग बंद असणार आहेत.

व्हिडिओ

हिंदू कॉलेज प्रभारी मीनू श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, “कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. कॉलेजमध्ये प्रवेश पहिल्या तासापासूनच मिळेल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी सकाळी 8:50 ते सकाळी 9 या वेळेतच महाविद्यालयात प्रवेश केला पाहिजे. जेणेकरून नंतर DU कॅम्पसमध्ये कोणतीही वाहतूक अथवा इतर अडथळे येऊ नयेत. झाकीर हुसेन कॉलेजने आपल्या कर्मचारी सदस्यांना आणि नवनियुक्त शिक्षकांना बहुउद्देशीय हॉल, दिल्ली विद्यापीठात समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे अनिवार्य केले.

ट्विट

दिल्ली विद्यापीठाची स्थापना 1 मे 1922 रोजी झाली आणि गेल्या शंभर वर्षांत 86 विभाग, 90 महाविद्यालये आणि 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला.