पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीर वासियांना शुभेच्छा देत व्यक्त केल्या देशाबद्दल भावना

त्यानुसार जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवण्यात येत असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतीयांना 7 ऑगस्ट रोजीच या निर्णयावरुन संबोधित करणार होते.

PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

मंगळवारी  लोकसभेत जम्मू-कश्मीर (Jammu-Kshmir) विभाजक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवण्यात येत असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतीयांना 7 ऑगस्ट रोजीच या निर्णयावरुन संबोधित करणार होते. मात्र सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पार पडला नाही.

नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन भाषणाला सुरुवात करताच प्रथम त्यांनी जम्मू-कश्मीर मधील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच जम्मू-कश्मीर येथील नागरिक अद्याप त्यांच्या मुलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र राष्ट्रासाठी आणि देशासाठी जम्मू-कश्मीरसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आले. तसेच सरदार वल्लभ भाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, डॉ. श्मामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहाजी वाजपेयी यांसारख्या करोडो देशाभक्तांचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे देशातील सर्व नागरिकांना समान हक्क आणि अधिकार मिळणार आहेत. जम्मू-कश्मीर आणि लद्दाख येथील नागरिकांसोबत जे वर्तवणूक केली जात होती त्याबद्दल कधीही चर्चा केली जात नव्हती.

कलम 370 आणि कलम 37 Aचा वापर करत काही लोकांनी देशाविरुद्ध लोकांच्या भावना भडकवण्यासाठी पाकिस्तानकडून या कलमांचा एका शस्राप्रमाणे उपयोग केला जात होता. आपल्या देशातील कोणाचेही सरकार असो ते देशाच्या भलासाठी नेहमीच कार्य करते असे मोदी यांनी म्हटले आहे.अन्य देशात सफाई कामगारांसाठी एक नियम लागू करण्यात आला होता. मात्र जम्मू-कश्मीरमध्ये या नियमापासून सफाई कर्मचारी वंचित होते. मात्र आता सर्व कर्मचाऱ्यांसह पोलिसांनासुद्धा बरोबरीच्या सुविधा देण्यात येणार आहेत.त्याचसोबत केंद्रीय आणि राज्यातील रिक्त पदांवर नोकरभरती लवकरच सुरु होणार असून याचा लाभ तेथील तरुणांना होणार आहे. तसेच जम्मू-कश्मीर येथे पब्लिक सेक्टर युनिट्स आणि प्रायव्हेट सेक्टर कंपन्याच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे.

लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश म्हणून कायम राहणार आहे. तसेच परिस्थिती बदलण्यानंतर जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्य म्हणून घोषित करण्यात येणार आहे. जम्मू-कश्मीर येथे पंचायत निवडणूकांसह विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्याचसोबत केंद्रशासित प्रदेशाचा भाग बनल्यानंतर लद्दाखमधील लोकांचा विकास करणे ही भारत सरकारची जबाबदारी असणार आहे. तर लद्दाख येथे स्पिरिच्युअल पर्यटन, अॅडवेंचर पर्यट आणि इको पर्यटन येथे सुरु करण्याची क्षमता फार आहे. सोलार पावर जनरेशनसाठी सुद्धा लद्दाख हे मोठे केंद्र बनू शकते. या राज्यातील तरुणांना उत्तम शिक्षणासाठी विविध संस्था निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना उत्तम हॉस्पिटलची सोय, बांधकाम आणि वेगाने आधुनिकीकरण येथे होणार आहे.(Jammu and Kashmir: जम्मू-कश्मीर मधील कलम 370 रद्द, विभाजन विधेयक 370 विरुद्ध 70 मतांनी लोकसभेत मंजूर)

जम्मू-कश्मीर आणि लद्दाखसाठी घेण्यात आलेला हा निर्णय अद्याप लोकांना पटलेला नाही. परंतु लोकशाहीच्या या देशात देशाचे हित काय आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीर आणि लद्दाखला एक नवी दिशा दाखण्यासाठी सरकारला मदत करावी अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच मोदी यांनी मुस्लिम बांधवांचा ईद हा सण जवळ येत असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर ईद दरम्यान जम्मू-कश्मीर येथे कोणतेही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे. त्याचसोबत जम्मू-कश्मीर बाहेर राहणाऱ्या लोकांनासुद्धा त्यांच्या घरी जाण्यासाठी मोदी सरकार संभाव्य मदत करणार असल्याचे मोदी यांनी भाषणाच्या शेवटी म्हटले आहे.