पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनं करतानाचे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर हिट; Yoga Day ची जय्यत तयारी
या दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगदिनाच्या काही दिवसांपूर्वीच विविध योगासनं करतानाचे आणि त्यांचे महत्त्व पटवून देणारे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
21 जून हा दिवस जागतिक योग दिन (World Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी योगदिनाच्या काही दिवसांपूर्वीच विविध योगासनं करतानाचे आणि त्यांचे महत्त्व पटवून देणारे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्रिकोणासन (Trikonasana) आणि ताडासन (Tadasana) यांचे दोन व्हिडिओज आतापर्यंत मोदींनी सोशल मीडियावर शेअर केले असून यात विधीवत आसने कशी करावी आणि त्यांचे महत्त्व मुद्देसूद पटवून दिले आहे.
पहा मोदींचे हे खास व्हिडिओज:
योग दिनाला काहीच दिवस बाकी असताना योगसाधेनेबद्दल नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृकता निर्माण करण्याचा मोदींचा हा एक प्रयत्न आहे. यामुळे अनेकांना योगसाधेनेची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.
2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणात मोदींनी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून 21 जून हा दिवस 'योगदिन' म्हणून साजरा केला जातो.