Cyclone Nisarga: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाची तीव्रता पाहता भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीजवळील तयारीचा घेतला आढावा, जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

तसेच महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगितले.

File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. उद्या म्हणजेच 3 जूनला महाराष्ट्रात रायगड जवळ हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुंबई सह इतर भागात पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील भागातील केलेल्या तयारीच्या आढावा घेतला. तसेच या दोन्ही राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. लोकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे मोदींनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगितले. Nisarga Cyclone: चक्रीवादळात नागरिकांनी काय विशेष काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये धडकण्याचा अंदाज असला तरीही मुंबई, केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टी लगत असणार्‍या मच्छिमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये गेलेल्या बोटी देखील माघारी बोलावण्याचं काम एनडीआरएफकडून करण्यात आलं आहे.

तसेच दोन्ही राज्यात NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यात महाराष्ट्रात 15 तर गुजरातमध्ये 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईत 3, रायगड मध्ये 4, पालघर, ठाणे आणि रत्नागिरीत प्रत्येकी 2, तर सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईत प्रत्येकी 1 NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे.