45 Years of Emergency: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 45 वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा; लोकशाहीच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्यांना शतशः नमन
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याने 1975-77 या काळात देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्याला 45 वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
25 जून 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याने 1975-77 या काळात देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्याला 45 वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती याबद्दलही सांगितले आहे. तसंच आणीबाणी काळात असलेल्या कठीण परिस्थितीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, "आणीबाणीच्या वेळेस लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना झेलल्या अशा सर्व लोकांना माझे शतशः नमन. त्या लोकांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरु शकणार नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आणीबीणी बद्दल बोलताना असे सांगितले की, "आपल्या नवी पीढीला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे."
PM Narendra Modi Tweet:
यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली होती. 45 वर्षांपूर्वी एका पार्टीने सत्तेच्या हव्यासापोटी संपूर्ण देशभरात आणीबाणी लागू केली होती. एका रात्रीत संपूर्ण देशाचे जेलमध्ये रुपांतर झाले होते. आणीबाणीमुळे गरीबांवर अत्याचार होत होते. प्रेस, कोर्ट यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते, असे अमित शाह म्हणाले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)