PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य
आता विस्तारवादाचा काळ संपला आणि विकसयुग सुरू झाल्याचं म्हणत चीनला सुनावले आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज लेह (Leh) लद्दाख मध्ये भरातीय जवानांना अचानक भेट देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. लद्दाख मध्ये निमू (Nimoo) येथून जवानांना संबोधित करताना त्यांनी आज चीनला इशारादेखील दिला आहे. दरम्यान इतिहासामध्ये विस्तारवादाने जगाचं मोठं नुकसान केलं आहे. पण आता विस्तारवादाचा काळ संपला आणि विकसयुग सुरू झाल्याचं म्हणत चीनला सुनावले आहे. दरम्यान आता अवघं जग विस्तारवादाविरूद्ध एकवटलं आहे असेदेखील म्हणत त्यांनी भारतीय जवानांच्या साहसाचं भारताला कौतुक असल्याचं म्हटलं आहे.
आज निमू मधून बोलताना विस्तारवादाबाबत बोलतानाच त्यांनी गलवान खोर्यात भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचं कौतुक देखील केलं आहे. लद्दाख हे भारताचं मस्तक आहे. भारताच्या सुरक्षेचा विचार करताना मी भारत माता आणि भारताच्या या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातेचाच विचार करतो. भारतीय जवानांमुळेच आम्ही सुरक्षित आहोत. आता आत्मानिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्यामध्येही भारतीय सैन्य महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी पुन्हा गलवान खोर्यातील शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ANI Tweet
कमकुवत कधीही शांतता प्रस्थापित करु शकत नाही, ती स्थापन करायची असेल तर आपल्याला शुरपणाच मदत करणार आहे. असे म्हणत त्यांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले आहे. आता सीमेवर भारताकडून तिप्पट खर्च केला जातो असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
आज नरेंद्र मोदी जवानांच्या भेटीला आले होते तेव्हा त्यांनी ' भारत माता की जय', ' वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या होत्या. दरम्यान आज लेह, लद्दाखच्या दौर्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीला परत येणार आहेत. तेथे एक उच्चस्तरीय बैठक देखील घेतली जाणार आहे.