Arogya Van: गुजरातच्या केवाडिया मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आरोग्य वन' चं उद्घाटन; Statue of Unity जवळ असणारे हे हर्बल गार्डन पहा आहे कसे?
योगा, ध्यान, आयुर्वेद यांचा आरोग्याला कसा फायदा होतो याच महत्त्व पटवून देत जनजागृतीचं काम देखील आरोग्य वन मध्ये होणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातमध्ये (Gujrat) दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आलेल्या मोदींनी आज नर्मदा जिल्ह्यात भव्य आरोग्य वन (Arogya Van) चं उद्घाटन केले आहे. हे वन लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी जवळ आहे. 17 एअर भागावर औषधी रोपांची यामध्ये लागवड करण्यात आली आहे. केवाडिया मध्ये येणार्या पर्यटाकांना आकर्षित करण्यासाठी तसेच औषधी वनस्पतींची ओळख त्याचे फायदे या वनात पहायला मिळणार आहेत. तसेच योगा, ध्यान, आयुर्वेद यांचा आरोग्याला कसा फायदा होतो याच महत्त्व पटवून देत जनजागृतीचं काम देखील आरोग्य वन मध्ये होणार आहे. Eid Milad-Un-Nabi 2020: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी जनतेला दिल्या मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा.
नरेंद्र मोदींचा आरोग्य वन मधील फेर फटका
आरोग्य कुटीर ला भेट
आरोग्य वन मध्ये नेमकं काय काय बघायला मिळणार?
- योगसाधनेचं महत्त्व पटवण्यासाठी आरोग्य वनच्या प्रवेशद्वारावरच सूर्य नमस्कारातील 12 देखील स्थितींचा समावेश असलेल्या मानवी आकृती आहेत.
- मानवी आयुष्यात वनऔषधींचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती देणारी डिजिटल इंफॉर्मेशन येथे आहे.
- कोणत्या अवयवासाठी कोणती वनौषधी आवश्यक आहे कसा वापर केला जाऊ शकतो याची माहिती देणारी एक मानवाकृती देखील या आरोग्य वनात आहे. ती आकृती या वनातील महत्त्वाचं आकर्षण देखील आहे.
- आरोग्य वनात पाच अन्य विविध गार्डन देखील आहेत. त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे.
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची उद्या 31 ऑक्टोबर दिवशी 145वी जयंती आहे. त्याचं अवचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी केवाडिया मध्ये Sardar Patel Zoological Park चं देखील उद्घाटन करणार आहेत.