PM Modi's Mother Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री Heeraben Modi यांनी वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हीराबेन मोदी यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयातून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करत शोक संदेश शेअर केला आहे.

Heeraben Modi Passes Away| PC: twitter/ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला आहे. 2 दिवसांपूर्वीच हीराबेन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अहमदाबादच्या यू एन मेहता हॉस्पिटलमध्ये (UN Mehta Hospital) दाखल केले होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचेही हॉस्पिटल कडून हेल्थ बुलेटीन जारी करत सांगण्यात आले होते.पण पुन्हा प्रकृती ढासळल्याने त्यांचे आज पहाटे रूग्णालयातच निधन झाले आहे. मातृशोकाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीट द्वारा दिली आहे.

हीराबेन मोदी यांच्यावर आज थोड्याच वेळात गुजरातच्या गांधीनगर मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मोदींचे कुटुंबीय सध्या घरीच आहे. त्यांची भेट घेण्यासाठी काही मंडळी पोहचत आहेत.

दरम्यान हीराबेन मोदी यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयातून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करत शोक संदेश शेअर केला आहे.

“एक तेजस्वी शतक ईश्वरचरणी विलीन झाले. आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्वीची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं ट्वीट करत त्यांनी हातात दिवा असलेल्या आईचा फोटो शेअर केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif