COVID-19 in India: भारतातील कोविड 19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आज उच्च स्तरीय बैठक
सक्रिय कोरोना रूग्ण 7026 झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची (COVID 19 In India) संख्या वाढत असल्याने आता चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत रूग्णवाढीसोबतच काही रूग्ण कोविड 19 मुळे दगावले असल्याने ही चिंता अजूनच वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून देशातील 5 राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या परिस्थितीवर आता आज (22 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एक उच्च स्तरीय बैठक घेणार आहेत. यामध्ये आरोग्य यंत्रणांची तयारी आणि अधिकार्यांची ते चौकशी करणार आहेत.
भारतामध्ये 1134 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. सक्रिय कोरोना रूग्ण 7026 झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हे देखील नक्की वाचा: COVID 19 In India: देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र सह या 5 राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश .
पहा ट्वीट
भारतात कोविड 19 मुळे दगावलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 5,30,813 झाली आहे. यामध्ये 5 नव्या मृतांची भर पडली आहे. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्र, केरळ मध्ये प्रत्येकी एक बळी नोंदवण्यात आला आहे. सध्या भारतात कोविड 19 चा डेली पॉझिटिव्हिटी रेट 1.09% झाला आहे. विकली पॉझिटीव्हिटी रेट 0.98% झाला आहे.