पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रासहित सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंंत्री व आरोग्य मंंत्र्यांंसोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत, संध्याकाळी 5.30 वाजता ही बैठक होणार असुन महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत.
देशात आज कोरोनाबाधितांंच्या आकड्याने 56 लाखाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) , पंंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) , आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karanatak) , उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), तामिळनाडू (Tamilnadu) , या सात राज्यात कोरोना चा अक्षरशः उद्रेक पाहायाला मिळतोय, याच पार्श्वभुमीवर आज या राज्यातील कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनाची स्थिती व सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यांच्या मुख्यमंंत्री व आरोग्य मंंत्र्यांंसोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत, संध्याकाळी 5.30 वाजता ही बैठक होणार असुन महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत. Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर
कोरोना बाधितांंची एकुण आकडेवारी पाहता या सात राज्यात देशातील 63% पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. तसेच एकूण रुग्णांपैकी 65.5% आणि एकूण मृत्यूंपैकी 77% रुग्ण देखील या राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये 2.0% पेक्षा जास्त मृत्यु दर आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त त्यांचे बाधित रुग्णाचे प्रमाण 8.52% राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. 24 सप्टेंबर रोजी PM Narendra Modi साधणार अभिनेता मिलिंद सोमण, ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद; जाणून घ्या काय आहे कारण
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकार, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांबरोबर प्रभावी सहकार्य आणि जवळून समन्वय साधत आहे, आरोग्य आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जातोय. ई-आयसीयू दूरध्वनी द्वारे आयसीयू सांभाळणाऱ्या डॉक्टरांच्या क्लिनिकल व्यवस्थापन क्षमतांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची पर्याप्त उपलब्धता आणि कोविड आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मुद्द्यांंवरुन आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये 83,347 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 1085 मृत्यू झाले आहेत. सध्या देशात कोविड 19 (Covid 19) ची लागण झालेल्यांची एकूण संख्या 5,646,011 पर्यंत पोहचली आहे. तर महाराष्ट्रातील एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 12 लाख 47 हजार 770 इतकी आहे.