PM Modi on Maha Kumbh Mela 2025 Stampede: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, ट्विटरवर पोस्ट शेअर
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
PM Modi on Maha Kumbh Mela 2025 Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा (MahaKumbh Mela 2025) सुरू आहे. गंगा-यमुना-सरस्तवी संगमावर मौनी अमावस्येच्या रात्री करोडो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. यादरम्यान 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेवर मोदी यांनी दुख: व्यक्त केले. ट्विटद्वारे त्यांनी भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त
<blockquote class="twitter-tweet"><p lang="hi" dir="ltr">प्रयागराज महाकुंभ में हुआ हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं ने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव मदद में जुटा हुआ है। इस सिलसिले में मैंने…</p>— Narendra Modi (@narendramodi) <a href="https://twitter.com/narendramodi/status/1884486027215266267?ref_src=twsrc%5Etfw">January 29, 2025</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, 'प्रयागराज महाकुंभात घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. घटनेत ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. सर्व जखमींची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे. मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. (Maha Kumbh Mela 2025 Stampede: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, काहींचा मृत्यू)
मध्यरात्री नेमक काय घडलं?
महाकुंभमध्ये दरम्यान मौनी अमावस्येचे स्नान मुख्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले होते. सर्वजण स्नानासाठी आतूर असल्याने धक्काबुक्की झाली. त्यादरम्यान, अनेकजण खाली पडले. आधीच गर्दी त्यात चालण्यासाठी अडथळे आल्याने परिस्थीती निर्माण झाल्याची घटना घडली. काहींनी घाबरून पळापळी केली आणि परिस्थीती नियंत्रणाबाहेर गेली. परिणामी या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेवर आखाडा परिषद संतप्त
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निरणय घेतला आहे. आखाड्याने छावण्यांमधील त्यांच्या मिरवणुकाही मागे घेतल्या आहेत. हिंदू धर्मानुसार, अमृत स्नान म्हणजे आज खूप मोठा सण होता. हा योग 140 वर्षांनंतर आला होता. असंही काही भाविकांचं म्हणण आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

