Pipeline Bursts in Chhatrapati Sambhaji Nagar: वाळुज एमआयडीसी परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

तर दुसरीकडे जलवाहिनी फुटत असल्याच्या घटना घडत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Water | PC: Pixabay.com

एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना छत्रपती  संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) जलवाहिनी फुटण्याच्या (Pipeline Bursts) घटना सातत्याने सुरूच आहेत.  छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वाळुज एमआयडीसीमधील गरवारे कंपनी समोर जलवाहिनी फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.  काही दिवसांपूर्वीच शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चितेगाव जवळ फुटली होती. त्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. आज पुन्हा एकदा ही जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. जलवाहिनी फुटण्याच्या घटना या सतत समोर येत असून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. (हेही वाचा - Pipeline Bursts in Borivali: बोरीवली परिसरातील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात BMC जलवाहीनी फुटली, रस्त्यांवर पाणीच पाणी (Video))

संभाजीनगर शहरांमध्ये पाणीटंचाई सुरू असून शहरातील काही भागांना आठ ते दहा दिवसाला पाणी येतं. तर दुसरीकडे जलवाहिनी फुटत असल्याच्या घटना घडत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान ही जलवाहिनी फुटल्याचा परिणाम वाळूज औद्योगिक परिसरात होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये सध्या अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.  अनेक खेड्या पाड्यांसह शहरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. उन्हाळ्याचे अजून 3 महिने जायचे आहेत. त्याआधीच नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. अशता आता जलवाहिनी फुटण्याच्या घटना देखील वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अशातच अशा जलवाहीनी फुटण्याच्या घटना घडत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.