Pfizer च्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पिफायझर कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांच्या पितृत्व रजा

पिफायझर मधील पुरुष कर्मचाऱ्यांना आता 12 आठवड्यांच्या पितृत्व रजा मिळणार असल्याची माहिती पिफायझर इंडियाच्या संचालिका शिल्पी सिंह यांनी दिली आहे.

पिफायझर यही जगप्रसिध्द अमेरिकन फार्मासिटीकल आणि बायोटेक्नोलॉजी कार्पोरेशन आहे. 1849 पासून अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात ही भक्कम कंपनी चालवली जाते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ही कंपनी चालवली जाते. जगातील विविध देशात या कंपनीचे हेडक्वार्टर्स आहेत. तर भारतात देखील पीफायझरचं कार्यालय आहे आणि पीफायझरच्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पिफायझर मधील पुरुष कर्मचाऱ्यांना आता 12 आठवड्यांच्या पितृत्व रजा मिळणार असल्याची माहिती पिफायझर इंडियाच्या संचालिका शिल्पी सिंह यांनी दिली आहे. फ्रेन्डली कामाच्या वातावरणाला चालना देण्यासाठी तसेच कामाप्रमाणे आपल्या कुटुबियांना देखील जपण्यासाठी पिफायझरच्या कर्मचाऱ्यांना पित्त्व रजा देण्यात येणार आहेत. तरी १ जानेवारी २०२३ पासुन ही धोरण पिफाझरच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहे.

 

बायोलॉजिकल पध्दतीने वडील होण्यासह मुल दत्तक घेणाऱ्या पालकास देखील ३ जानेवारीच्या पितृत्व रजा मिळणार आहे. पिता होणाऱ्या कर्मचाऱ्यास कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त ६ आठवड्यांच्या सुट्ट्या मिळणार आहेत.  पण काही अडचण असल्यास या सुट्ट्या बारा आठवड्यांपर्यत वाढवण्याची मुभा पिफायझर कडून देण्यात आली आहे. पिफायझर प्रमाणेच नोव्हारटीस या ड्रग कंपनीकडून देखील पितृत्व सुट्ट्या दिल्या जातात. तरी पितृत्वाच्या सुट्ट्या मिळणार असण्यामुळे भारतीय पिफाझर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.(हे ही वाचा:- Maternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार!)

 

ज्याप्रमाणे स्त्रीला मातृत्वाच्या सुट्ट्या मिळतात. त्याचप्रमाणे पुरुषासही पित्तृत्वाच्या सुट्ट्या मिळाल्याने आता पाल्यास आई आणि वडिलासोबत सारखा वेळ घालवता येणार आहे. तरी पिफायझरच्या नव्या धोरणाचं कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं असुन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.