पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत घसरण; गाठला 3 महिन्यातील निच्चांकी दर
आज देशभरात पेट्रोल 21 पैसे तर डिझेल 24 पैशांनी स्वस्त झाले. गुरुवारी पेट्रोलमध्ये 8 ते 10 पैसे आणि डिझेल 12 ते 13 पैशांची घसरण झाली आहे.
Petrol & Diesel Rates: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज शुक्रवारी सुद्धा घसरताना दिसून आले. आज देशभरात पेट्रोल 21 पैसे तर डिझेल 24 पैशांनी स्वस्त झाले. गुरुवारी पेट्रोलमध्ये 8 ते 10 पैसे आणि डिझेल 12 ते 13 पैशांची घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या दरातील घसरणीने इंधनची किंमत मागील तीन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आली आहे. दर कपातीचा हा सपाटा 12 जानेवारी पासून सुरु असून आतापर्यंत एकूण पेट्रोल 3 रुपये 26 पैसे आणि डिझेल 3 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे. फेब्रुवारी महिन्यातच मागील सात दिवसात पेट्रोल 51 पैसे आणि डिझेल 54 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा धावणार; राज्य परिवहन प्राधिकरणाची प्रस्तावाला मंजुरी
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर पाहिल्यास, मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर 78. 55 रुपये तर डिझेल 68. 84 रुपये झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचा भाव 62. 68 रुपये असून डिझेलचा दर 65. 68 रुपये आहे. बंगळुरू मध्ये पेट्रोलचा भाव 75. 14 रुपये आणि डिझेलचा भाव 67. 69 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल साठी ग्राहकांना 75. 51 रुपये आणि डिझेलसाठी 69. 37 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, खनिज तेलाच्या किमती मात्र सातत्याने वाढत आहे, शुक्रवारी खनिज तेलाचा भाव 32 सेंट्सने आणि 55. 25 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.भारतात एकूण मागणीच्या 80 टक्के खनिज तेलाची आयात केली जाते. नीती आयोगाच्या शिफारशीनुसार पेट्रोल आणि डिझेल मध्ये सुद्धा 15 टक्के इथेनॉलचे मिश्रण केल्यास दर आणखीन उतरणायची शक्यता आहे.