Petrol Diesel Rate in India: भारतात पेट्रोल-डिझेल भाववाढ कायम, पाहूया 22 जूनचे दर
त्यानुसार मुंबईत पेट्रोल 86.36 प्रति लीटर इतके झाले असून डिझेल 76.69 प्रतिलीटर इतके झाले आहे.
Petrol Diesel Rate Today in India: लॉकडाऊन काळात वाढलेली महागाईने सामान्य जनतेचे कंबरडं मोडलेले असताना पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel) दरातही भाववाढ कायम आहे. मुंबईसह (Mumbai) भारतातील महत्वाच्या शहरात सलग 16 व्या दिवशीही दरवाढ कायम आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली शहरात पेट्रोल 0.33 पैशांनी महागले असून डिझेल 0.58 पैशांनी महागले आहे. त्यानुसार आज नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलचे दर 79.56 प्रति लीटर असून डिझेलचे दर 78.85 प्रतिलीटर इतकी आहे. महाराष्ट्रात मुंबई (Mumbai) शहरातही पेट्रोल डिझेल दर वाढले आहेत. हे वाढते दर पाहता नागरिकांनी लॉकडाऊन काळात अतिशय त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबईत पेट्रोल 0.32 पैशांनी महागले असून डिझेल 0.55 पैशांनी महागले आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोल 86.36 प्रति लीटर इतके झाले असून डिझेल 76.69 प्रतिलीटर इतके झाले आहे.
पाहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:
शहर | पेट्रोल दर | डिझेल दर |
मुंबई | रु. 86.36 | रु. 77.24 |
दिल्ली | रु. 79.56 | रु. 78.85 |
चेन्नई | रु. 82.87 | रु. 76.30 |
कोलकाता | रु. 81.27 | रु. 74.14 |
ऑईल कंपन्या 7 जून पासून इंधनाच्या दरात वाढ करत आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी वाढलेली एक्साईज ड्युटी ग्राहकांवर लादली नाही. वाढलेली एक्साईज ड्युटी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या इंधनाच्या किंमतीसह अॅडजेस्ट करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती बदलत आहेत आणि तेल कंपन्या बदलत्या किंमतीनुसार आपले दर अॅडजेस्ट करत आहे.