Petrol, Diesel Prices Today: पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले, जाणून घ्या आजचे नवे दर

प्रतिदिन हे दर वाढत आसून, ग्राहकांच्या खिशावरील भार वाढतोच आहे. आज (1 नोव्हेंबर 2021) पुन्हा एकदा देशातील इंधन दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) 35 पैशांनी वाढले.

Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

पेट्रोल-डिझेल दरवाढ आता सर्वसामान्यांना नित्याचीच बाब होऊन बसली आहे. प्रतिदिन हे दर वाढत आसून, ग्राहकांच्या खिशावरील भार वाढतोच आहे. आज (1 नोव्हेंबर 2021) पुन्हा एकदा देशातील इंधन दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) 35 पैशांनी वाढले. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेल दरांनी नवा उच्चांक नोंदवला. नव्या दरांनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 109.69 रुपये आणि 98.42 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. तर हेच पेट्रोल, डिझेल मुंबई शहरात अनुक्रमे 115.50 रुपये आणि 106.62 प्रतिली लीटर दराने विक्री केले जात आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर.

देशात पेट्रोल, डिझेल पाठीमागील आठवडाभरापासून सलग वाढत आहेत. ही वाढ प्रतिदिन 35 पैसै प्रतिलीटर इतकी आहे. तेलबाजारातील अभ्यासक सांगतात की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल (Crude Oil) दरात वाढ झाल्याने देशांतर्कत पेट्रोल, डिझेल दरातही मोठी वाढ होत आहे. (हेही वाचा, Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध)

इंधन वितरक कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) ने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील प्रमुख देशांमध्येही पेट्रोल, डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर (प्रतिलीटर)

शहर                           पेट्रोल                              डिझेल

दिल्ली                    109.69 रुपये                   98.42 रुपये

मुंबई                      115.50 रुपये                    106.62 रुपये

कोलकाता             110.15 रुपये                     101.56 रुपये

चेन्नई                     106.35 रुपये                     102.59 रुपये

ट्विट

पेट्रोल-डिझेल दरांत वाढ झाल्याने बाजारातील इतर गोष्टीही महागल्या आहेत. प्रामुख्याने फळभाज्या आणि इतर वस्तू, वाहतूक, तसे रस्त्यांवर मिळणाऱ्या वस्तुंपासून ते हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर घटकांच्या किमतीमध्येही मोठीच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड ऑईल 85 डॉलर प्रति बॅरल इतके आहे. हाच दर 90 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.