Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
अनेक राज्यांमध्ये पहिल्यांदाच इंधनाचे दर शंभरीपार गेले आहेत.
देशात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) पुन्हा एकदा वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पहिल्यांदाच इंधनाचे दर शंभरीपार गेले आहेत. एएनआयच्या (ANI) वृत्तानुसार, आज दिल्लीत (Delhi) पेट्रोल 100.91 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 89.88 रुपये प्रती लीटर ने मिळत आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 106.93 रुपये आणि 97.46 रुपये प्रती लीटरने विकले जात आहे. भोपाळ (Bhopal) मध्ये पेट्रोल 109.24 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 98.67 रुपये प्रती लीटर इतके आहे. कोलकाता (Kolkata) मध्ये पेट्रोलचे दर 101.01 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 92.97 रुपये प्रती लीटरने मिळत आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 101.67 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रती लीटरने विकले जात आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. लखनऊमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत अनुक्रमे 98.01 रुपये आणि 90.27 रुपये इतकी झाली आहे. वरील किंमती पाहता मुंबई, भोपाळ, कोलकाता, चैन्नई, बंगळुरु मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
ANI Tweet:
दरम्यान, पेट्रोल दर वाढीविरुद्ध राज्यात आंदोलनं होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस याविरोधात आंदोलन करत असून यास पूर्णत: केंद्र सरकार जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र दिवसेंदविस इंधनाचे दर वाढतच आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे.