Petrol and Diesel Prices On July 15: मागील 3 दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आता पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; पहा मुंबई, दिल्ली सह तुमच्या शहरातील दर!
भारतामध्ये सध्या 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचा भाव 100 रूपयांच्या पार गेला आहे.
भारतामध्ये आज (15 जुलै) ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून इंधनाचे दर पुन्हा वाढवण्यात आले आहेत. दरम्यान मागील 2-3 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते मात्र आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सध्या मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेल देखील आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. देशातील चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Rates) आज 31-39 पैसे वधारला आहे तर डीझेलचा दर (Diesel Price) 15-21 पैसे वाढल्याचं सांगण्यात आले आहे. जुलै 2021 मध्ये पेट्रोलचा दर 8 वेळेस तर डिझेलचा दर महिन्यात 5 वेळेस वाढला आणि एक वेळा उतरला आहे. पण सध्या सारी कडेच इंधनाचे दर हे आतापर्यंत उच्चांकी स्तरावर आहेत.
भारतामध्ये सध्या 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचा भाव 100 रूपयांच्या पार गेला आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, लद्दाख, कर्नाटक, जम्मू कश्मीर, ओड़िशा, तमिलनाडु, बिहार, केरल, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह देशातील प्रमुख शहरातील इंधन दर
- दिल्ली - पेट्रोल: 101.54 रुपये, डिझेल : 89.87 रुपये
- मुंबई - पेट्रोल: 107.54 रुपये, डिझेल : 97.45 रुपये
- कोलकाता - पेट्रोल: 101.74 रुपये, डिझेल : 93.02 रुपये
- चेन्नई - पेट्रोल: 102.23 रुपये, डिझेल : 94.39 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबत्च मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात. इंडियन ऑयल चे ग्राहक मोबाइल मधून RSP सोबत शहराचा कोड टाकून 9224992249 वर मेसेज पाठवू शकतात. BPCLचे ग्राहक RSP टाइप करून 9223112222 वर SMS पाठवू शकतात. HPCL चे ग्राहक HPPrice लिहून 9222201122 वर SMS पाठवून दर पाहू शकतात.