PayU Lays Off: पेयू कंपनी करणार 6% कर्मचारी कपात, कारण घ्या जाणून

स्थानिक पातळीवर आपल्या पुनर्संरचना करण्याचे उद्दिष्ट ठेऊन PayU कंपनी 6 टक्के कर्मचारी कपात केली आहे. त्यानुसार 150 नोकर्‍या कमी केल्या आहेत. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. PayU ही कंपनी Naspers च्या मालकीची आहे. कपनीमध्ये अनेक ठिकाणी टाळेबंदी पाहायला मिळत आहे.

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

स्थानिक पातळीवर आपल्या पुनर्संरचना करण्याचे उद्दिष्ट ठेऊन PayU कंपनी 6 टक्के कर्मचारी कपात केली आहे. त्यानुसार 150 नोकर्‍या कमी केल्या आहेत. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. PayU ही कंपनी Naspers च्या मालकीची आहे. कपनीमध्ये अनेक ठिकाणी टाळेबंदी पाहायला मिळत आहे. PayU कंपनी Naspers च्या मालकीची आहे. Naspers ने PayU चे इंडिया युनिट आणि Wimbo 2019 मध्ये विकत घेतले आहे. जे एक पेमेंट सिक्युरिटी आणि मोबाइल पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी आहे. PayU India च्या fintech व्यवसायांमध्ये Wimbo, Citrus आणि LazyPay यांचा समावेश आहे.

PayU च्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने सर्वोच्च धोरणात्मक प्राधान्यक्रम लक्षात घेऊन भारतातील काही व्यवसायिक विभागांची पुनर्रचना करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कंपनीला त्यांच्या काही सहकाऱ्यांबाबत मार्ग काढवा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची संख्या 150 इतकी आहे. जे आमच्या एकूण कर्मचार्‍यांच्या संख्येच्या 6% पेक्षा कमी आहेत, संघटनात्मक पुनर्संरचनामुळे प्रभावित होतील. (हेही वाचा, Google Layoffs: आता गुगलची मूळ कंपनी Alphabet मध्ये कर्मचारी कपात; 10,000 लोकांना काढून टाकण्यात येणार)

PayU ची मालकी असलेल्या दक्षिण आफ्रिकन Naspers ची गुंतवणूक शाखा, Prosus ने PayU द्वारे ऑनलाइन पेमेंट गेटवे BillDesk चे प्रस्तावित USD 4.7 बिलियन संपादन रद्द केले. भारताच्या अविश्वास नियामक कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने ऑगस्ट 2021 मध्ये पहिल्यांदा जाहीर केलेल्या कराराला मान्यता दिल्यानंतर एक महिन्याच्या आत या कालावधीची समाप्ती झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement