LPG Cylinder बुकींगवर Paytm कडून 2,700 रुपयांचे कॅशबॅक; पहा काय आहे ऑफर

नवीन युजर्संना 2700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

Paytm & LPG Cylinder (Photo Credits: File Image)

एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Cylinder) बुकींगवर पेटीएमकडून (Paytm) कॅशबॅक (Cashback) आणि इतर रिव्हॉर्डस (Rewards) दिले जात आहेत. तसंच  नवीन युजर्संना 2700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. त्यासोबतच पहिल्या तीन महिन्याच्या बुकींगसाठी प्रत्येकी 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार असल्याचे पेटीएमने सांगितले आहे. पूर्वीपासून पेटीएमचे युजर्स असलेल्या ग्राहकांना प्रत्येक बुकींगमागे 5000 कॅशबॅक पॉईंट्स मिळतील. या कॅशबॅक पॉईंट्सचा वापर करुन पेटीएमवर उपलब्ध असलेल्या मोठ्या ब्रँड्सवर तुम्ही डिस्काऊंट मिळवू शकता, असे पेटीएमने सांगितले.

3 पे 2700 असे या पेटीएमच्या नवीन कॅशबॅक ऑफरचे नाव असून ही ऑफर इंनडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या मोठ्या 3 एलपीजी कंपन्यावरच उपलब्ध आहे. यासोबतच पेटीएम ग्राहक पेटीएम नाऊ पे लेटर या प्रोग्रॅमचा वापर करुन सिलेंडरचे पैसे पुढच्या महिन्यात देखील देऊ शकतात. हा प्रोग्रॅम पेटीएम पोस्ट पेड म्हणून पण ओळखला जातो.

युजर्सचा सिलेंडर बुकींग अनुभव सुधारण्यासाठी पेटीएमने नवनवीन फिचर्स अॅड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची डिलिव्हरी ट्रॅक करु शकता आणि त्यासोबतच सिलेंडर रिफिल करण्यासाठी तुम्हाला ऑटोमेटेड रिमायंडर्स देखील येतील.

मागील वर्षी पेटीएमने एचपी गॅससोबत पार्टनरशिप करत सिलेंडर बुकींग फॅसिलिटी सुरु केली होती. त्यानंतर इंडियन ऑईल्सचे इनडेन आणि भारत गॅस या कंपन्यासोबत देखील पेटीएमने टायअप केला. सोप्या आणि साध्या बुकींग प्रोसेसमुळे सिलेंडर बुकींगसाठी ग्राहक वारंवार पेटीएमचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.