पटना: 60 वर्षीय रुग्णावर Mucormycosis ची यशस्वी शस्त्रक्रिया; 3 तासांच्या सर्जरीनंतर हटवण्यात आले क्रिकेट बॉलच्या आकाराचे Black Fungus
बिहार (Bihar) मधील पटना (Patna)येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (Indira Gandhi Institute of Medical Sciences) म्हणजेच आयजीआयएमएस (IGIMS)मधील डॉक्टरांनी शुक्रवारी ब्लॅक फंगसची यशस्वी सर्जरी केली.
Cricket Ball-Sized Black Fungus: बिहार (Bihar) मधील पटना (Patna)येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (Indira Gandhi Institute of Medical Sciences) म्हणजेच आयजीआयएमएस (IGIMS) मधील डॉक्टरांनी शुक्रवारी ब्लॅक फंगसची यशस्वी सर्जरी केली. या सर्जरीमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यातून क्रिकेट बॉलच्या आकाराचे ब्लॅक फंगस (Cricket Ball-Sized Black Fungus)काढण्यात आले. ही सर्जरी सुमारे 3 तास सुरु होती. त्यानंतर आता रुग्ण अनिल कुमार यांची प्रकृती स्थिर आहे.
IGIMS चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगतिले की, इतक्या मोठ्या आकाराचे ब्लॅक फंगस असलेली म्युकरमायकोसिसचा हा पहिला रुग्ण होता. आतापर्यंत इतके तीव्र इन्फेकशन असलेले रुग्ण राज्यात आढळून आले नव्हते. पुढे ते म्हणाले की, डॉ. ब्रजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली टीमने अगदी शिफायतीने ऑपरेशन केले की रुग्णाच्या डोळ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. (Black Funguses ची औषध टॅक्स फ्री, कोरोनाच्या लसीवर 5 टक्के GST कायम राहणार)
कोरोनामुक्त झालेल्या अनिल कुमार यांना दोन आठवड्यांपूर्वी फिट आली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनावर स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे त्यांना IGIMS मध्ये दाखल करण्यात आले. सीटी स्कॅन आणि एमआरआय टेस्ट केल्यानंतर डोक्यावर गंभीर स्वरुपात म्युकरमायकोसिस असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची सर्जरी करण्याचे ठरले आणि त्यात क्रिकेट बॉलच्या आकाराचे ब्लॅक फंगस इंफेक्शन आणि 100 मिलीमीटरचा फोड देखील काढण्यात आला. (Black Fungus वरील उपचारासाठी IIT Hyderabad ने बनवली Amphotericin B ओरल टॅबलेट)
अनिल कुमार यांची सर्जरी करणारे डॉ. ब्रजेश यांनी सांगितले की, रुग्णाच्या नाकाच्या मार्गाने कपाळापर्यंत ब्लॅक फंगसचे इंफेक्शन पसरले होते. या वेगाने पसरणाऱ्या संसर्गामुळे त्यांना फिट आली. दरम्यान, ही दुर्मिळ, क्लिष्ट सर्जरी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल IGIMS संचालक डॉ. एन आर बिस्वास यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.