Parliament MP Suspended: लोकसभेतून आज सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदारांचे निलंबन

संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं

Lok Sabha | Twitter

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) यावेळी खासदारांच्या निलंबनामुळे गाजले आहे. लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभा (Rajyasabha) अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून गोंधळ घालण्यात आला. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच निलंबित करण्यात आलं आहे. (हेही वाचा - List of suspended MPs From LS: किती खासदार संसदेतून झाले निलंबीत? पाहा यादी)

राजधानी नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.

यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.