Hike In Condom Sale: कोरोना महामारीनंतर कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत कमालीची वाढ तर देशभरात नसबंदीचं प्रमाण कमी
कोविड महामारी दरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत मात्र कमालीची वाढ झाली आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या अहवालानुसार 2021-22 या वर्षात नसबंदीच्या संख्येत तब्बल 25 टक्क्यांनी घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारी बघता पुरुष आणि महिला नसबंदी झपाट्याने कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. पण कोविड महामारी दरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत मात्र कमालीची वाढ झाली आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या अहवालानुसार 2021-22 या वर्षात नसबंदीच्या स्क्येत तब्बल 25 टक्क्यांनी घट झाली आहे. तर याच वर्षभरात मात्र कंडोमचे वितरण सात टक्क्यांनी तर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर दुप्पटीने वाढला आहे. जगभरात दोन वर्षापूर्वी कोरोना महामारी पसरली होती, भारतात देखील भीती आणि चिंतेचं वातावरण होतं तरीही कंडोम 2020-21 च्या तुलनेत २०२१-२२ दरम्यान कंडोम विक्रीच्या दरात 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अहवालात स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तुलनेत सर्वाधिक कंडोमची विक्री करण्यात आली. तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि झारखंड या राज्यात देखील कमालीची कंडोम विक्री बघायला मिळाली.
देशभरात 2020-21 या वर्षभरात 31.45 कोटी कंडोमची विक्री झाली तर 2021-22 दरम्यान 33.70 कोटी कंडोमची विक्री झाली. तुलनेत तब्बल २ कोटी कंडोमची अधिक विक्री झाली. लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 2018-19 दरम्यान आजवर सर्वाधिक कंडोम विक्रीचा 34.44 कोटीं विक्रम आहे. आता पर्यतच्या कंडोम विक्रीतला हा सर्वात मोठा आकडा आहे. तसेच कोव्हिड महामारी दरम्यान गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत देखील अचानक मोठी वाढ झाली. किंबहूना या पिल्स म्हणजे एक गर्भनिरोदक पध्दतचं लोकांना वाटू लागली. तसेच, 2020-21 च्या तुलनेत गर्भनिरोधक (COC) गोळ्यांच्या विक्रीत देखील 8.7 टक्के वाढ झाली आहे. (हे ही वाचा:- Used Condom in Local Train: मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर सापडला वापरलेला कंडोम; फोटो व्हायरल, चौकशीचे आदेश)
2020-21 या वर्षभरात गर्भनिरोधक 57.1 लाख गोळ्यांची विक्री झाली. तर तुलनेत 2021-22 मध्ये तब्बल 76.5 लाख गर्भनिरोधक गोळ्या विकण्यात आल्या आहेत. म्हणजेचं फक्त वर्षभरात तब्बल जवळपास २० लाख गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. किंबहूना यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या संख्येने भारतात गर्भनिरोधक गोळ्या विकल्या गेल्या नाही. भारतात सर्वाधिक गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी उत्तर प्रदेशातून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून या गोळ्यांची मागणी करण्यात आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)