पाकिस्तानी पत्रकाराचं खळबळजनक ट्वीट - कराची मध्ये पाक एअरफोर्सचं पेट्रोलिंग, ट्विटर युजर्स ने केला शहरात रात्रभर ब्लॅक आऊट आणि भारतीय वायुसेनेचं विमान दिसल्याचा दावा

दरम्यान त्याची झलक ट्वीटरवर देखील पहायला मिळाली आहे.

Pakistan Air Force JF-17 Thunder Jet | (Photo Credits: Wikip .. Read more at: https://www.latestly.com/social-viral/journalist-tweets-paf-patrolling-the-sky-amid-karachi-blackout-as-pakistani-twitter-users-claim-seeing-iaf-jets-formation-over-city-check-tweets-1812419.html

पाकिस्तान मध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या हल्लाच्या दहशतीने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान त्याची झलक ट्वीटरवर देखील पहायला मिळाली आहे. परिणामी कराची (Karachi)हा शब्द ट्रेंड होताना दिसत आहे. मात्र भारतीय सुरक्षा एजंसी आणि आयएएसद्वारा या घटनेची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्स द्वारा कराचीमध्ये स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, भारताकडून हल्ला होईल या भीतीने शहरामध्ये रात्रभर ब्लॅक आऊट करण्यात आला होता. भारताच्या लष्कराला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही जेट मसरूर एयर बेस कडून एयर पैट्रोलिंग मिशन सुरू केले होते. त्यामुळे रात्रभर पाकिस्तानी लढाऊ विमान कराचीमध्ये आकाशात घिरट्या घालत होते. पाकिस्तानने जम्मू कश्मीरमध्ये एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधींचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

पाकिस्तानी पत्रकार वजहत काजमी (Wajahat Kazmi)चे ट्वीट-

सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत ज्यामध्ये लढाऊ विमानं आकाशामध्ये उडत आहेत. मात्र कोणत्याही व्हिडीओबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र अशी चर्चा आहे की आयएएफच्या लढाऊ विमानाने सिंध प्रांताजवळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ उडाण घेतल्याने आता पाकिस्ताननेदेखील सावधतेची भूमिका घेतली आहे.