Noida Shocker: लिव्ह-इन पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून बेरोजगार तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या; नोएडामधील धक्कादायक घटना
सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर बेरोजगार असल्याने वारंवार टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मुलगी त्याला वारंवार म्हणत होती की, तो केवळ बसून खात आहे.
उत्तर प्रदेशातील हायटेक सिटी नोएडा (Noida) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अभियंत्याने परस्परसंबंधात म्हणजेच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणीच्या वारंवार होणाऱ्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या (Suicide) केली. तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. ही भीषण घटना घडण्यापूर्वी मृताने सुसाईड नोटही लिहिली आहे. आत्महत्या करणारा तरुण गेल्या चार वर्षांपासून एका तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. तो बी.टेक पास होता, मात्र शिक्षणानंतर नोकरी न मिळाल्याने तो सध्या मानसिक तणावातून जात होता.
माहितीनुसार, सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्फाबाद गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका अभियंत्याने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर बेरोजगार असल्याने वारंवार टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मुलगी त्याला वारंवार म्हणत होती की, तो केवळ बसून खात आहे.
सुसाइड नोटनुसार, मयंक चंदेल असे मृत अभियंत्याचे नाव आहे. बेरोजगारीमुळे मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी असे भयानक पाऊल उचलले. पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 4.17 च्या सुमारास PRV पोलिसांना सर्फाबाद गावातील शौर्य बँक्वेट हॉलच्या मागे असलेल्या गल्लीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमला अमरपाल यादवच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर फासावर लटकलेला मृतदेह आढळून आला. (हेही वाचा: Greater Noida: खोलीत सापडला पतीचा मृतदेह, पत्नी फरार, पोलिसांकडून तपास सुरु)
मयंक चंदेल असे मृताचे नाव असून तो शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबादचा रहिवासी आहे. मयंक गेल्या तीन वर्षांपासून प्रीतीसोबत घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रीती सतत त्याला तो बेरोजगार असल्याने टोमणे मारत होती व यामुळे तो तणावात होता. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. फील्ड युनिटला पाचारण करून पुरावे गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.