निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या Petrol Diesel वरील Excise Duty 8 रुपयाने वाढवण्याच्या दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी
पेट्रोल डिझेल वरील Excise Duty मध्ये भविष्यात 8 रुपयांची वाढ करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या विधेयकाला मंंजुरी मिळाली आहे.
अर्थसंकल्प 2020 (Budget 2020) मधील पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel Rates) दरांच्या संबंधित दुरुस्ती विधेयक काल, अर्थसंकल्प अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेसमोर मांडले. यानुसार पेट्रोल डिझेल वरील Excise Duty मध्ये भविष्यात 8 रुपयांची वाढ करण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतील अशी तरतूद आहे. या विधेयकाला बिनविरोध सर्व खासदारांची एकत्र मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे भविष्यात पेट्रोल वरील Excise Duty वाढून 18 रुपये प्रतिलिटर तर डिझेल वरील Excise Duty वाढून 12 रुपये प्रति लिटर अशी होऊ शकते.
प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी 14 मार्च 2020 ला सुद्धा केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेलच्या Excise Duty मध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, यामागे वार्षिक उत्पन्नात 39,000 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित होती. Gold & Silver Rate Today: सोने- चांदी चा भाव वधारला; मुंबई, दिल्ली, कोलकाता सहित प्रमुख शहरातील आजचे दर जाणून घ्या
PTI ट्विट
दरम्यान, सुधारित कायद्यानुसार आता केंद्र सरकारची विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क वाढवण्याची क्षमता ही सर्वात जास्त करण्यात आली आहे. यानुसार पेट्रोलचे शुल्क 10 रुपयांनी तर डिझेलचे शुल्क 4 रुपयांनी वाढू शकते. मात्र तूर्तास केवळ अधिकाराच्या बाबत बदल करण्यात आलेले आहेत सध्याच्या Excise Duty मध्ये काहीही बदल किंबहुना वाढ करण्यात आलेली नाही.