Nirbhaya Rape Case: आरोपी विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; 3 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
तर दुसरीकडे आरोपी अक्षयने दया याचिका दाखल केली आहे. याबाबतची पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीला होणार आहे.
संपूर्ण देशाला सुन्न करणा-या 2012 मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे बातमी कानावर येते ना येत तोच त्यांच्या फाशीवर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली. या प्रकणातील 4 आरोपींना फाशी होणार त्याआधी या आरोपींनी एकापाठोपाठ एक दया याचिका देण्याची रीघ लावली आहे. त्यामुळे याचिका देणे आणि ती फेटाळणे हा प्रकार सध्या सुरु आहे. त्यात आता आरोपी विनयची देखील दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. तर दुसरीकडे आरोपी अक्षयने दया याचिका दाखल केली आहे. याबाबतची पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीला होणार आहे.
निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी फाशीची देण्यात येणार होती. यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले होते. मात्र, पुढील आदेशांपर्यत निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. कनिष्ठ कोर्टाने 9 महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
ANI चे ट्विट:
दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चौघांपैकी अक्षय कुमार याने केलेली सुधारित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी ही त्याची विनंतीही न्यायालयाने अमान्य केली होती.