Nipah Alarm In Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरस संसर्गाचे वृत्त, 5 नमुने पुण्यातील टॉप व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटला पाठवले

केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात काही नागरिकांना निपाह व्हायरस संसर्ग झाल्याची चर्चा आहे.

Nipah Virus | (Photo credit: archived, edited, representative image)

Nipah Outbreak in Kera: ताप आल्याचे निदान झाल्यानंतर दोन रुग्णांचा अनैसर्गिक आणि संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर केरळ सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात काही नागरिकांना निपाह व्हायरस संसर्ग झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत पाच संशयीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे (National Institute of Virology Pune) येथे पडताळणीसाठी पाठवले आहेत. अहवालांची प्रतिक्षा आहे. पडताणी अहवाल आल्यानंतरच रुग्णांच्या आजाराबाबत स्पष्टता येणार आहे.

निपाह विषाणूच्या संसर्गामुळे संशयास्पद असलेल्या दोन मृत्यूची नोंद झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हानिहाय आरोग्य अलर्ट सोमवारी जारी केला आहे. दरम्यान, पुण्यातील व्हायरॉलॉजी इन्स्टूट्यूटमध्ये संशयीत रुग्णासोबतच त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे नमुनेही पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हे सर्व नातेवाईक रुग्णाच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंगळवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकार दोन मृत्यूंकडे गांभीर्याने पाहत आहे आणि निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाल्याच्या संशयावरून आरोग्य विभागाने जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. सरकार आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. खास करुन व्हायरस संसर्गाने संशयास्पद मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आप्तेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

ट्विट

दरम्यान, राज्याच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी सदर जिल्ह्यात दाखल होत संभाव्य स्थितीचा आढवा गेण्यासाठी एक उच्चस्थरीय बैठक बोलावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पुण्यातील लॅबचे अहवाल जर पॉझिटीव्ह आले तर आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जाईल. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाच्या संपर्कातआलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यास प्राधान्य दिले जाईल. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, खाजगी रुग्णालयात पहिला मृत्यू झाला आहे. मत्यू झालेली व्यक्ती महिला असून तिची मुले, भाऊ आणि त्याचे नातेवाईक देखील तापावर उपचार घेत आहेत असेही त्या म्हणाल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif