Nikki Yadav Murder Case:आरोपी Sahil Gehlot सह 5 जणांना निक्की यादव च्या खून प्रकरणी अटक; साहिलच्या वडिलांचाही समावेश
त्यामधूनच खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी निक्की यादव (Nikki Yadav) या तरूणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनरने खून करून काही तासांमध्ये दुसरं लग्न केल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. आता पोलिस तपासामध्ये या हत्याकांडामागील अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान निक्कीचा खून करणारा तिचा साथिदार साहिल सोबत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये साहिल च्या वडिलांचा देखील समावेश आहे. त्यांच्यावर मुलाला या हत्याकांडामध्ये मदतीचा आरोप लावण्यात आला आहे. साहिलचा मित्र, भाऊ, चुलत भावंडं देखील अटकेत आहेत.
पोलिस तपासामध्ये साहिल आणि निक्की विवाहबद्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाची काही कागदपत्रं देखील पोलिसांना सापडली आहे. लिव्ह इन मध्ये राहणारी ही जोडी ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडात एका मंदिरामध्ये विवाहबद्ध झाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, साहिलचे कुटुंबिय या लग्नाबाबत नाखूष होते. 9-10 फेब्रुवारीच्या रात्री साहिलने कारमध्ये निक्कीचा मोबाईल चार्जरच्या कॅबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच्याच धाब्याच्या फ्रीजमध्ये लपवला. त्यासाठी त्याला मित्राने, भावंडांनी मदत केली होती.
पहा ट्वीट
निक्कीच्या मोबाईल फोन मधून सारा डेटा साहिलने हटवला असल्याचं समोर आलं आहे. आरोपीला ठाऊक होतं की त्यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट्स ही मोठा पुरावा ठरू शकतात. त्यामुळे त्याने आधीच ते हटवले होते. दिल्ली पोलिसच्या क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, आरोपीने निक्कीच्या खूनानंतर तिचा फोन बंद करून स्वतःकडे ठेवला. सीम कार्ड देखील मोबाईल मधून काढलं होतं. तो फोनदेखील पोलिसांनी आता ताब्यात घेतला आहे.
निक्कीला साहिलच्या दुसर्या लग्नाबाबतचे प्लॅन्स समजले तेव्हा तिने या सार्याचा बाब विचारला आणि त्यामधून दोघांमध्ये वाद झाले. सध्या सीसीटिव्हीच्या आधारे या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.