New Strain of Coronavirus in India: भारतामध्ये ब्रिटन मधीन नवीन कोरोना वायरसची लागण असलेल्या रूग्णांची संख्या 29 वर
म्युटंट कोरोना वायरस पूर्वीच्या वायरसपेक्षा 70% अधिक वेगाने पसरू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतामध्ये नव्या कोरोना वायरसचा स्ट्रेंट मिळाल्यानंतर आता दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत आहे. आज (1 जानेवारी) या नव्या म्युटेंट कोरोना वायरसची बाधा झालेली संख्या 29 वर पोहचली आहे. सध्या भारतामध्ये हा नवा कोरोना वायरस पसरू नये म्हणून युके वरून येणारी विमानसेवा स्थगित करण्यात आली आहेत. पण यापूर्वीच युकेमध्ये प्रवास केलेले आणि भारतामध्ये दाखल झालेले रूग्ण पाहता दिवसागणिक देशात त्याची संख्या वाढत आहे. हा म्युटंट कोरोना वायरस पूर्वीच्या वायरसपेक्षा 70% अधिक वेगाने पसरू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान भारतामध्ये विविध ठिकाणी युके मध्ये प्रवास करून आल्याचा इतिहास असणार्यांची चाचणी केली जात आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जात आहे. अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना घरी जाण्याची मुभा आहे मात्र पॉझिटिव्ह रूग्णांना रूग्णालयात देखील विशेष देखरेखीखाली ठेवलं जात आहे. साथीच्या रोगापेक्षा कोविड19 च्या रुग्णांना पाच पट अधिक मृत्यूचा धोका.
ANI Tweet
महाराष्ट्रातही पुण्याच्या वायरॉलॉजी लॅबमध्ये कोविडची चाचणीचे नमुने दाखल करून त्यांना म्युटेट वायरसची लागण तर झाली ना याची तपासणी केली जात आहे. भारतामध्ये अद्याप कोरोना लस उपलब्ध नाही. मात्र येत्या काही दिवसांतच तिला मान्यता मिळू शकते असा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात उद्यापासून ड्राय रन देखील सुरू केल्या जात आहेत.