IPL Auction 2025 Live

New Parliament Building Foundation: लोकशाही ही भारताची संस्कृती- पंतप्रधान मोदी

आम्ही भारतीय जनता एकत्रितपणे संसदेची ही नवीन इमारत बांधू. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये अनेक नव्या गोष्टी असतील.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

लोकशाही (Democracy) ही भारताची संस्कृती आहे. लोकशाही म्हणजे जीवन मूल्य, जीवनशैली आणि भारतासाठी राष्ट्राच्या जीवनाचा आत्मा. शतकानुशतके अनुभव घेऊन विकसित केलेली लोकशाही ही एक यंत्रणा आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या पायाभरणी समारंभात बोलताना व्यक्त केल्या. भारती संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन (New Parliament Building Foundation पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे आज (गुरुवार, 10 डिसेंबर) पार पडले या वेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नवीन संसदेच्या इमारतीचा पाया घातला गेल्याने आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही भारतीय जनता एकत्रितपणे संसदेची ही नवीन इमारत बांधू. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये अनेक नव्या गोष्टी असतील. या इमरतीमुळे संसद सदस्यांची कार्यक्षमता वाढेल. त्यांच्या कामात, निर्णयक्षमतेमध्ये मोठा बदल होईल. खासदारांच्या कामाला आधुनिकतेची जोड मिळेल. संसदेची नवी इमारत म्हणजे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल. संसदेची नवी इमारत ही नव्या भारताच्या, 21 व्या शतकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करेन. (हेही वाचा, Central Vista Bhumi Puja Live Streaming on DD News: PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे भूमिपूजन; इथे पहा या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग)

दरम्यान, नवे संसद भवन एकूण चार मजली असणार आहे. संसदेची ही नवी इमारत बांधून पूर्ण करण्यासाटी 971 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. ही इमारत साधारण 64500 वर्ग मीटर इतक्या जागेत उभारली जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षापर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे.

नव्या इमारतीत भारताच्या गौरवशाली परंपरा आणि संपन्नतेचे दर्शन घडविण्यात येईल. त्यासबतच आधुनिक दृश्य- श्रव्य संचार सुवाधा डेटा नेटवर्क प्रणाली आदींचाही वापर करण्यात येईल. जगभरातील वास्तूंचा अभ्यास करुन भारतीय वास्तूरचनाशास्त्राचे दर्शन घडवत ही इमारत दिमाखात पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.