NCP, शिवसेनेचं संसदेबाहेर आंदोलन! केंद्र सरकारने महाराष्ट्राचा 25,000 कोटी रुपयांंचा GST परतावा दिला नाही, संजय राउत यांंची माहिती

आज संंसद परिसरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंंग्रेस सह 9 पक्षांंनी केंद्र सरकार कडुन जीएसटी परतावा मिळवण्यासाठी आंदोलन केले होते यात सहभागी होत शिवसेनेचे खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांंनी केंद्राकडुन महाराष्ट्राला 25 हजार कोटींचा जीएसटी परतावा अद्याप मिळाला नसल्याचे म्हंंटले आहे.

Sanjay Raut Protest In Parliament Monsoon Session (Photo Credits: ANI)

Parliament Monsoon Session 2020: दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदीय पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी संसद परिसर शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) , समाजवादी पक्ष (Samajvadi Party), आप (AAP) , आरजेडी (RJD), टीआरएस (TRS) , टीएमसी (TMC) या पक्षाच्या खासदारांंच्या नारेबाजीने दणादणुन उठला आहे. केंद्राकडुन राज्यांंना मिळणारा जीएसटी परतावा (GST Returns) अद्याप दिला गेला नसल्याने आज या संबंंधित पक्षांंच्या खासदारांंनी मोदी सरकार विरुद्ध घोषणा दिल्या. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राउत (Sanjay Raut)  हे सुद्धा सहभागी होते. यावेळी संजय राउत यांंनी माध्यमांंना दिलेल्या प्रतिक्रियेत केंद्राकडुन महाराष्ट्राला 25 हजार कोटींचा जीएसटी परतावा अद्याप मिळाला नसल्याचे म्हंंटले आहे. Parliament's Monsoon Session: कोरोना संक्रमित लोक पापड खाऊन बरे झाले का? राज्यांचे GST चे पैसे द्या; शिवसेना खासदार संजय राऊत राज्यसभेत आक्रमक (पाहा व्हिडिओ)

संजय राउत यांंच्या माहितीनुसार केंद्र सरकारने महाराष्ट्राला 25 हजार कोटींंचा जीएसटी परतावा देणे शिल्लक आहे मात्र अजुनही यासाठी सरकार तयारी दर्शवत नाहीये, देशात कोरोनाचं संकट असताना आणि त्यातही महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता आर्थिक निधी उपलब्ध नसल्यास राज्य कोरोनाला लढा कसा देईल? लोकांंचे जीव कसे वाचवेल? असे सवाल राऊत यांंनी केले आहेत. तसेच, महाराष्ट्रात नॉन बीजेपी सरकार असल्याने अशी वागणुक मिळत असल्याचे सुद्धा राउत यांंनी अप्रत्यक्षरित्या म्हंंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात आज राज्यसभेत संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह यांंनी भारत चीन तणावाविषयी माहिती दिली. तर दुसरीकडे, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना संदर्भात सर्व देशभर सरकारने घेतलेल्या उपायांवर भाष्य केले. आज सभागृहात खासदारांंचे वेतन आणि भत्ते (दुरुस्ती), Insolvency and Bankruptcy (दुरुस्ती), Homoeopathy Central Council (दुरुस्ती),The Indian Medicine Central Council (दुरुस्ती) ही विधेयके मांंडली गेली.