Navratri 2020 6th Day Saree Colour: क्रांती रेडकर ते शर्मिष्ठा राऊतच्या पिवळ्या रंगाच्या साड्यांमधील लूक पाहून तयार व्हा शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवसासाठी!
आज 22 ऑक्टोबर, शारदीय नवरात्री (Sharadiya Navratri) मधील सहावा दिवस. शारदीय नवरात्रीमध्ये सध्या नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे नऊ दिवशी नऊ वेगवेगळ्या रंगाचा क्रम ठरवून कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक रुढी-परंपरा नसल्या तरीही सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून अनेक जण यामध्ये सहभागी होता. त्यानुसार यंदा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबरला पिवळा रंग (Yellow Colour) आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रीमधील हा नऊ रंगाच्या क्रम वारांनुसार, त्याच्या अधिपती ग्रहांनुसार ठरवला जातो. या नियमाप्रमाणे गुरूवारी पिवळा रंग घालण्याची प्रथा आहे. नवरात्री व्यतिरिक्त देखील इतर दिवसांमध्ये गुरूवारी अनेकजण पिवळे कपडे परिधान करतात.Navratri 2020 Dates & Colours for Facemask: सुरक्षित शारदीय नवरात्रोत्सवासाठी यंदा पहा नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार कोणत्या तारखेला कोणत्या रंगाचा मास्क वापराल?
पिवळा रंग हा प्रसन्नतेचा, चैतन्याचा रंग आहे. लिंबूरंगापासून अगदी पिवळा धम्माक अशा विविध शेड्स मधेय पिवळा रंग खुलून दिसतो. महाराष्ट्रात हिंदू लग्नकार्यात नववधूसाठी पिवळ्या रंगाची साडी हमखास निवडली जाते. त्यामुळे अनेक नववधूंकडे हमखास पिवळ्या रंगाची साडी असेल. पांढर्या रंगाच्या जवळपास जाणारी पिवळ्या रंगाची फिटी छटा असल्याने अनेकांवर हा रंग खुलून दिसतो.
पिवळ्या रंगातील साड्या आणि त्यासोबत मिक्स मॅच
शर्मिष्ठा राऊत
हेमांगी कवी
आदिती सारंगधर
क्रांती रेडकर
यंदा नवरात्रीमध्ये 17 ऑक्टोबरला राखाडी, 18 ऑक्टोबरला नारंगी, 19ऑक्टोबरला पांढरा, 20 ऑक्टोबरला लाल, 21ऑक्टोबरला निळा, 22ऑक्टोबरला पिवळा, 23ऑक्टोबरला हिरवा, 24ऑक्टोबरला मोरपिसी, 25ऑक्टोबरला जांभळा रंग आहे.
आता नवरात्रीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे कन्या पुजनाच्या निमित्ताने, अष्टमी, नवमीच्या पुजेच्या निमित्ताने अनेकजणी एकमेकांना भेटतात. पुजा विधीचे कार्यक्रम होतात. त्यानिमित्ताने तुम्ही ठेवणीतील पिवळ्या रंगातील अनेक साड्या, ड्रेस काढू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)