नवी मुंबईच्या गणेश नाईक यांच्या नावे आहे एक वेगळाच विक्रम; जाणून घ्या कोणता

त्यांनी रचलेला हा विक्रम इतका मोठा आहे की आजवर कोणीही तो तोडण्याचा प्रयत्नही केला नाही.

Ganesh Naik (Photo Credits: Facebook)

भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांनी एक वेगळाच विक्रम रचला आहे. त्यांनी रचलेला हा विक्रम इतका मोठा आहे की आजवर कोणीही तो तोडण्याचा प्रयत्नही केला नाही.

1962 सालापासून महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत एकूण 12 निवडणुका झाल्या आहेत आणि त्यातून 3396 उमेदवारांची आमदारपदी नेमणूक झाली आहे. पण त्यातील एकानेही आजवर गणेश नाशिक यांचा विक्रम मोडला नाही.

सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम गणेश यांच्या नावे आहे. 2004 साली विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत त्यांना 3,24,706 इतकी मते मिळाली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी त्यांचा स्वतःचा विक्रम तोडला होता. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांना 2 लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होते. तेव्हा त्यांनी शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली होती.

मतदानाच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारावर गोळ्या झाडून व गाडी जाळून झाला जीवघेणा हल्ला

तसेच सर्वात कमी मते मिळवत निवडणूक जिंकण्याचा विक्रम आहे जयराम शेटे यांच्या नावे. त्यांनी 1962 साली लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 6211 मते मिळवत विजय प्राप्त केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif