Navi Mumbai Crime: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई,16 कोटींचे ड्रग्ज जप्त; 11 नायजेरियन व्यक्तींना अटक

तब्बल 16 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी 11 नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

Police Representative Image (Photo Credits: Instagram)

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत पोलिसांनी तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहे.जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये कोकेन आणि एमडी ड्रग्सचा समावेश आहे. तर 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. तेथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिस (Navi Mumbai Police) ना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. (हेही वाचा :Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली शहरातील अनधिकृत शाळांची यादी; पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणे टाळण्याचे आवाहन (See List) )

या कारवाईत पोलिसांना तब्बल 16 कोटींचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहेत. या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? आत्तापर्यंत किती ड्रग त्यांनी विकला? त्याचे साथीदार कोण आहेत? त्यांची साखळी कशी आहे? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या 17 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. यात 14 पुरुषांसह तीन महिलांचा समावेश होता. कोंढवा, येवलेवाडी, मांजरी, उंड्री आणि पिसोळी परिसरातून नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.