जम्मू-काश्मीर: पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या करणारा दहशतवादी नवीद जट्ट याचा चकमकीत खात्मा
राइजिंग कश्मीर न्यूज पेपर (Rising Kashmir News Paper) एडिटर शुजात बुखारी यांची हत्या १४ जून रोजी झाली होती
Naveed Jatt killed in Budgam encounter: जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दोन दहशतवाद्यांपैकी एक जण लश्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba)या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉटेड दहशतवादी होता. नवीद जट्ट (Naveed jaat)असे या दहशतवाद्याचे नाव आहे. नवीद जट्ट हा पत्रकार शुजात बुखारी (Journalist Shujaat Bukhari)यांच्या हत्या प्रकरणात सहभागी होता. राइजिंग कश्मीर न्यूज पेपर (Rising Kashmir News Paper) एडिटर शुजात बुखारी यांची हत्या १४ जून रोजी झाली होती.
जम्मू-काश्मीर येथील बडगाम येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराच्या जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच जवानांनी शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान, दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ही कारवाई झाल्यानंतर परिसरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळ इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (हेही वाचा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाकिस्तान ट्रेड कॉरिडोरला स्थानिकांचा तीव्र विरोध)
लश्कर ये तोयबा (Lashkar-e-Taiba)चा मोस्टवॉन्टेड दहशतवादी नवीद याला 2014मध्ये दक्षिण काश्मीर परिसरातील कुलगाम येथून अटक करण्यात आले होते. अटक केल्यावर त्याला श्रीनगर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, त्याल वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना दहशतवाद्यांनी पोलिसावर गोळीबार केला आणि त्याला पळवून नेले.