Nation-wide Bank Strike: बँका आज बंद! तब्बल 10 लाख कर्मचारी संपावर
Nation-wide Bank Strike Today: देशभरातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आज (बुधवार, 26 डिसेंबर) एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर (Bank Strike) जात आहेत. आजच्या संपात देशभरातून सुमारे 10 लाख कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर गेल्याने बँकेचे कामकाज ठप्प राहणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण, कर्मचारी वेतनवाढ तसेच, इतर अनेक मागण्या आणि मुद्द्यांवरुन बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees ) संप पुकारला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँक (Dena Bank) या बँकांचे बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda) या बँकेत विलिनीकरण केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे. एकाच आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेली संपाची ही दुसरी वेळ आहे. या आधीही विलिनीकरण आणि वेतनवाढ या मुद्द्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्याव या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 21 डिसेंबरला लाक्षणिक संप केला होता. असे असले तरी, खासगी बँकांसाठी मात्र आजचा दिवस नियमित दिवसांसारखा सामान्यच असणार आहे. कारण हा संप सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा आहे. दरम्यान, यूनायटेड फोर ऑफ बँक यूनियन्स (UFBU) नेही संपाचे अवाहन केले आहे.
यूनायटेड फोर ऑफ बँक यूनियन्स (UFBU)ही सुमारे ऊन बँकांची संघटना आहे. यात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोशियेशन (AIBE), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्पॉईज (NCBE) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) या संघटनांचा समावेश आहे. यूएफबीयूने दावा केला आहे की, त्यांचे सदस्य 10 लाखांहून अधिक आहेत. एआयबीईएचे महासचिव सी एच वेकटचलम यांनी म्हटले आहे की, अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्त (Additional Chief Labor Commissioner) यांनी बैठक बोलावली होती. मात्र, त्यात कोणाताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीदरम्यान, सरकार किंवा संबंधीत बँका अथवा इतर अधिकृत यंत्रणेने येऊन आम्हाला कोणताही विश्वास दिला नाही की, आम्ही बँकांच्या विलिणीकरणाचे पाऊल टाकणार नाही. (हेही वाचा, पाच जानेवारीला सरकारी कार्यालयांचं कामकाज ठप्प; कर्मचारी संपावर)
कर्मचारी संघटनांनी दावा केला आहे की, बँकांचे विलिणीकरण करुन सरकारला काही बँकांचा आकार वाढवायचा आहे. परंतू, देशभरातील सार्व सार्वजनिक बँकांचेही विलिणीकरण केले तरी, एकत्रित दिसणाऱ्या उत्पन्नाचा आकडा जगभरातील दहा पहिल्या दहा बँकांमध्ये स्थान मिळवू शकत नाही. सरकारने सप्टेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिणीकरण करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे बँक ऑफ बडोदा ही देशातील सर्वात मोठी तिसरी बँक म्हणून अस्तित्वात येईल.