नाशिक अपघाताच्या मृतांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रामनाथ कोविंद यांनी खास ट्विट च्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली

Amit Shah | Photo Credits: File Photos

नाशिकमध्ये काल (29 जानेवारी) मालेगावहून कळवनकडे जाणारी बस आणि रिक्षामध्ये झालेला अपघात थरकाप उडवणारा होता. सुमारे 60 फूट खोल विहिरीत कोसळलेल्या दोन्ही वाहनांमधील 26 जण ठार झाले आहेत तर 32 जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री आमित शाह  यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमींवर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. Nashik Accident: रिक्षा-बस विहीरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 26 ठार, 32 जखमी; बचावकार्य संपलं.  

विहीरीत बस आणि रिक्षा कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात रात्री उशिरा अग्निशमन दलाला यश आलं आहे. आज सकाळी या अपघातासाठी प्रशासनाने बचावकार्य थांबवल्याची माहिती दिली आहे.

अमित शहा यांचं ट्वीट

रामनाथ कोविंद यांचं ट्वीट

नाशिकच्या अपघातामध्ये जे प्रवासी व कर्मचारी ठार झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.